#bms

Published: 19 September 2024
on channel: URJA VEDH
171
7

ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान पाच हजार रुपये पेन्शन द्या
भारतीय मजदूर संघाची पंतप्रधानांना मागणी.
नांदेड (१९) भारतीय मजदूर संघाने देशभरात आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी किमान पाच हजार रुपये पेन्शन, आयुष्मान भारत योजनेत त्यांना सामावून घेणे आणि महागाई निर्देशांकाप्रमाणे त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करणे या प्रमुख मागण्यांचे निवेदन माननीय पंतप्रधानांना पाठविण्याचा कार्यक्रम आखला होता त्यानुसार भारतीय मजदूर संघ नांदेड कडून माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.
Eps-95 मधील कर्मचारी आज हलाखीचे जीवन जगत असून त्यांना मिळणाऱ्या तूटपुंज्या पेन्शन मधून काहीही साध्य होत नाही. साधा औषधाचा खर्चही त्यातून भागत नाही तर बाकी जीवनाचं काय असा प्रश्न उभा राहिला असून भारतीय मजदूर संघाने eps-95 मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत देशभरात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना eps-95 मधील किमान पेशंट 5000 करा, ई पी एस 95 मधील कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देणे आणि महागाई निर्देशांक प्रमाणे पेन्शनमध्ये वाढ करा या प्रमुख मागण्यांचे निवेदन पाठविण्याचा कार्यक्रम 19 सप्टेंबर वार गुरुवार रोजी तडीस नेला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघाने घोषणाबाजी केली आणि निवासी उप जिल्हाधिकारी मा.महेश वडदकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचवल्या जातील असे आश्वासन निवासी उप जिल्हाधिकारी माननीय महेश वडदकर यांनी भारतीय मजदूर संघाला दिले.
याप्रसंगी भारतीय मजूर संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी निलेवार,प्रमोद देशमुख, जिल्हा सचिव अनुप जोंधळे, कोषाध्यक्ष राजकमल बाकलीवाल, बांधकाम कामगार संघाचे प्रदेश सरचिटणीस संजय सुरोशे, नांदेड जिल्हा सचिव गजानन टोकलवाड, कृष्णा इंगळे, सरदार रुपेंद्र सिंग, दत्ताजी शिंदे, श्रीरंग कदम, दीपक अंबुलगेकर, वीज कामगार महासंघाचे संघटन मंत्री श्याम मंठाळकर, वीज कामगार महासंघाचे झोन सचिव प्रमोद देशमुख, अनिल पोतदार, संदीप ठाकूर, प्रभू कांबळे, विजय बदनापूरकर, जी एन फरकंडे, किशन गीते, व्ही एन तेलंग, कुंभारवाड, आर बी दूडके, श्री राहेगावकर, एम व्ही देशपांडे, श्री दुमाने, श्री गणपत थळंगे, श्री देगावकर, श्री शेवाळकर, एस एन जोशी, दुर्गादास देशमुख, श्री त्रिपाठी, मोहन कुरुडे, एस एम गोरे, श्री जेठरा, श्री राजा, अश्विनी देशमुख, शिल्पा मंठाळकर आदींची उपस्थिती होती.
भारतीय मजदूर संघाने eps-95 कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे वाढीव पेन्शन मिळण्याच्या आशा जिवंत झाल्या आहेत, भारतीय मजदूर संघाने नेहमीच श्रमिकांच्या हितासाठी काम केले आहे त्यामुळे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी भारतीय मजदूर संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि जगभरातील क्रमांक एक च्या संघटनेचे सभासद व्हावे असे आवाहन प्रमोद देशमुख, दीपक अंबुलगेकर, बालाजी निलेवार, अनुप जोंधळे यांनी केले आहे


Watch video #bms online without registration, duration hours minute second in high quality. This video was added by user URJA VEDH 19 September 2024, don't forget to share it with your friends and acquaintances, it has been viewed on our site 171 once and liked it 7 people.